पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून - जुलै २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. राष्ट्रीय संघांसोबतच पाकिस्तान महिलांच्या अ क्रिकेट संघाने देखील तीन ५० षटकांचे आणि तीन २० षटकांचे सामने वेस्ट इंडीज अ महिलांविरुद्ध खेळले.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने अनौपचारिक ट्वेंटी२० सामने हे त्या त्या दिवशी त्याच मैदानावर थोड्या वेळाच्या अंतराने खेळविण्यात आले. दोन्ही संघांमधली ही पहिलीच अ संघाची द्विपक्षीय मालिका होती. ५० षटकांचे अनौपचारिक सामने हे विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या सरावासाठी आयोजित करण्यात आले. वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी स्टेफनी टेलरकडे कर्णधारपद दिले तर अनौपचारिक सामन्यांची रेनीस बॉइसला कर्णधार नेमले. पाकिस्तानने जव्हेरिया खानकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांची जवाबदारी दिली. तसेच सिद्रा नवाझ हिला २० षटकांच्या सामन्यांसाठी कर्णधार नेमण्यात आले आणि रमीन शमीमला ५० षटकांच्या सामन्यांसाठी कर्णधार नियुक्त केले गेले.
पहिल्या ट्वेंटी२० सामन्यातच पुरुष अथवा महिला प्रकारात निदा दर ट्वेंटी२०त १०० गडी बाद करणारी पाकिस्तानची पहिली क्रिकेट खेळाडू ठरली. २ जुलै २०२१ रोजी दुसऱ्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यादरम्यान वेस्ट इंडीजच्या छिनेल हेन्री आणि चेडिअन नेशन ह्या दोघी अचानक भोवळ येऊन मैदानावर पडल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली. त्या दोघींना लागलीच इस्पीतळात दाखल करण्यात आले. थोड्यावेळानेच दोघी खेळाडूंची प्रकृती स्थिर असल्याचे इस्पीतळाकरून स्पष्ट करण्यात आले. दोन्ही खेळाडूंच्या जागी बदली खेळाडू नियुक्त झाल्यावर उर्वरीत सामना खेळवला गेला. दोन्ही खेळाडू तिसरा सामना खेळण्यासाठी परत ठणठणीत होऊन संघात परतल्या.
पाकिस्तान अ महिलांनी २० षटकांची मालिका ३-० ने जिंकली. तसेच दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय महिला संघाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली. तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यात वेस्ट इंडीजची कर्णधार स्टेफनी टेलर हिने हॅट्रीक घेतली. महिला ट्वेंटी२०त हॅट्रीक घेणारी स्टेफनी वेस्ट इंडीजची दुसरी खेळाडू ठरली. वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय महिला संघाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत मालिकेत अभेद्य आघाडी मिळवली. पाकिस्तानी महिलांनी चौथा सामना जिंकला आणि दौऱ्यातील पहिला विजय मिळवला. दुसरीकडे पाकिस्तान अ महिला संघाने ५० षटकांची मालिका ३-० ने जिंकली.
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.