पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७

पाकिस्तान क्रिकेट संघ जुलै २०१७ मध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-२० सामना खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा करणार होता. मार्च २०१७ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी), पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) पाकिस्तानमध्ये दोन ट्वेंटी-२० सामने खेळण्यासाठीचे आमंत्रण नाकारले होते.

एप्रिल २०१७ मध्ये, दौरा रद्द केला गेला. दौरा पुढे ढकलण्याचे मुख्य कारण सांगताना पीसीबीचे अध्यक्ष शाहियार खान म्हणाले की,

"याआधी दोन वेळा पाकिस्तानने परस्पर संवादाशिवाय दोन वेळा बांगलादेश दौरा केला आहे. शाहरियार पुढे म्हणाले, की ते पुढील वर्षी किंवा नंतर इतर वेळच्या शक्यतेचा विचार करतील."

बीसीबीच्या माध्यम समितीचे अध्यक्ष म्हणाले की, या निर्णयाबद्दल ते "खरोखर आश्चर्यचकित" झाले. पीसीबी आणि बीसीबी दरम्यान अधिकृत संवाद झाला नाही, बीसीबीला दौरा रद्द झाल्याचे प्रसारमाध्यमांकडून कळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →