पांडुरंग नथुजी राजभोज उर्फ बापूसाहेब राजभोज (१५ मार्च १९०५ - २ जुलै १९८४) हे एक भारतीय राजकारणी होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांनी १९५७-६२ दरम्यान राज्यसभेमध्ये बॉम्बे स्टेटचे प्रतिनिधित्व केले.
१९४२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे ते सरचिटणीस होते.
महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार असताना पा.ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, आणि त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली होती.
त्यांनी मराठीमध्ये लष्करी पेशा हे पुस्तक लिहिले. १९८४ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांना दोन मुलगे व दोन मुलगी होती.
पां.न. राजभोज
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?