पांडुरंग पुंडलिक तथा भाऊसाहेब फुंडकर (२१ ऑगस्ट, १९५०: खामगाव - ३१ मे, २०१८:मुंबई) हे भारतीय राजकारणी होते. शांत संयमी अशी प्रतिमा जपत त्यांनी संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ते भाजपा असा प्रवास केला महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानांच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये सक्रिय झाले होते. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. ते महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री होते.
यांचा मुलगा आकाश पांडुरंग फुंडकर महाराष्ट्राच्या १३व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडुन गेला.
1989 ते 1998 या कालावधी मध्ये अकोला लोकसभा मतदार संघातून खासदार होऊन काँग्रेस च्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यात त्यांना यश आले. आणि याच काळात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी या दिग्गज नेत्यांशी संपर्क वाढला. 11 एप्रिल 2005 ला विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. तसेच 25 एप्रिल 2008 रोजी दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेता म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
जून 2009 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सन 2006-2007 या कालावधीतील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
पांडुरंग पुंडलिक फुंडकर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.