रामकृष्ण सूर्यभान उपाख्य दादासाहेब गवई (३० ऑक्टोबर १९२९ – २५ जुलै, २०१५) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, आणि रिपाइं गवई गटाचे संस्थापक व अध्यक्ष होते. ते आंबेडकर प्रणीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, आणि या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातही अनेक कामे केली. गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही काम केले होते. ते बिहार, सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल, तसेच लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य (खासदार) होते. गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सलग ३० वर्ष सदस्य (आमदार) होते, यादम्यान त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, उपासभापती व विरोधी पक्षनेता या पदांवर कार्य केले होते. त्यांवी अनेक सामाजिक कामे सुद्धा केलेली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रा.सु. गवई
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.