भारतीय रिपब्लिकन पक्ष किंवा भारिप (इंग्रजी: Republican Party of India-RPI) हा भारतातील राजकीय पक्ष आहे.
या पक्षाचे सध्या अनेक गट आहेत. ज्यात रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांचे भारिप (आ) व भारिप बहुजन महासंघ हे गट प्रमुख आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून "भारतीय रिपब्लिकन पक्ष" स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती, परंतु पक्ष स्थापन करण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अनुयायी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
भारतीय रिपब्लिकन पक्ष
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?