पा (चित्रपट)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पा हा २००९ सालचा भारतीय हिंदी कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अरुंधती नाग आणि विद्या बालन यांनी अभिनय केलेला. प्रोजेरिया सारख्या एका दुर्मिळ अनुवंशिक रोगावर व एका मुलाच्या त्याच्या पालकांसोबतच्या नात्यावर हा चित्रपट आधारित आहे. खऱ्या आयुष्यात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन अनुक्रमे वडील आणि मुलगा आहेत, पण पा चित्रपटा मध्ये त्या दोघांनी अगदी उलट भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट ४ डिसेंबर २००९ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी झाली. भारतीय चित्रपट समीक्षकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले असले तरी मेटाक्रिटिक आणि रोटेन टोमॅटो वेबसाइट्सच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाला परदेशी चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यांच्या अभिनयासाठी अमिताभ बच्चन यांना ५७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाचवा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार आणि विद्या बालन यांना पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →