पनवेल रेल्वे स्थानक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पनवेल रेल्वे स्थानक

पनवेल हे पनवेल शहरामधील व नवी मुंबईतील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवर, कोकण रेल्वेवर आणि मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावरून मुंबई छशिमट, ठाणे, गोरेगाव साठी धीम्या लोकल व वसई रोड-रोहा रेल्वेमार्गवरून डहाणू, वसई, दिवा, पेण, रोहा यांसाठी मेमू धावतात. कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या तसेच कर्जतमार्गे पुण्याला जाणाऱ्या गाड्या पनवेलला थांबतात. पनवेल रेल्वे स्थानकामध्ये ७ फलाट असून त्यातील ४ उपनगरी तर ३ लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात. हे रेल्वे स्थानक सिडको द्वारे विकसित केले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →