मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकांच्या यादीमध्ये भारतातील महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरी रेल्वेवरील स्थानके आहेत. मुंबई उपनगरी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी सुरू झाली. ही प्रणाली पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेद्वारे चालवली जाते. प्रत्येक मार्गात मंद (धीमी) आणि जलद मार्गिका असतात. मंद मार्गिकांवरून उपनगरी गाड्या चालतात तर जलद मार्गिकांवरून हे भारतीय रेल्वेच्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच सर्व स्थानकांवर न थांबणाऱ्या उपनगरी गाड्या चालतात. मुंबईमधील काही रेल्वे स्थानकांवर उपनगरी तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.
मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये ७ प्रमुख मार्ग आहेत:
पश्चिम मार्ग
मध्य मार्ग
हार्बर मार्ग
ट्रान्सहार्बर मार्ग
बंदर मार्ग
वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग
हे मार्ग अनेक ठिकाणी एकमेकांना मिळतात. ही प्रणाली ब्रॉडगेज वर चालते. यातील बव्हंश रुळ जमिनीवरच आहेत. ही रेल्वेसेवा पहाटे ४ ते पहाटे १ वाजेपर्यंत चालते. यातून दररोज सरासरी ८० लाख प्रवासी प्रवास करतात.
मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकांची यादी
या विषयातील रहस्ये उलगडा.