पतंजली आयुर्वेद, किंवा केवळ पतंजली, ही एक भारतीय बहुराष्ट्रीय समूह धारक कंपनी आहे, जी भारतातील हरिद्वार येथे आहे. याची स्थापना योग गुरू स्वामी रामदेव आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांनी २००६ मध्ये केली होती. या कंपनीचे कार्यालय दिल्ली येथे आहे, तर उत्पादन युनिट आणि मुख्यालय हरिद्वार येथील औद्योगिक परिसरात आहे. ही कंपनी सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक औषध, वैयक्तिक काळजी उत्पादने FMCG (जलद रित्या विकला जाणारा माल) आणि खाद्य उत्पादने तयार करते. ९४ टक्के समभाग हिस्सा असलेल्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण आहेत. रामदेव कंपनीचे प्रतिनिधित्व करतात आणि धोरणात्मक निर्णय घेतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पतंजली आयुर्वेद
या विषयातील रहस्ये उलगडा.