रोटी (१९७४ चित्रपट)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

रोटी हा १९७४ मध्ये मनमोहन देसाई दिग्दर्शित आणि रजनी देसाई आणि राजेश खन्ना यांनी आशीर्वाद पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्मित केलेला हिंदी भाषेतील अ‍ॅक्शन चित्रपट आहे. यात खन्ना आणि मुमताज यांच्या भूमिका आहेत, तर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर १९७४ रोजी बेनाम आणि रोटी कपडा और मकान या चित्रपटांसह प्रदर्शित झाला होता. कादर खान यांना चित्रपटासाठी संवाद लिहिण्यासाठी ₹ १.२१ लाख मानधन देण्यात आले होते. हा चित्रपट तेलुगूमध्ये नेरम नदी कडू अकालीदी या नावाने रिमेक करण्यात आला होता, ज्यामध्ये एन.टी. रामाराव आणि मंजुळा यांनी अभिनय केला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →