हीरो हा १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला सुभाष घई दिग्दर्शित हिंदी भाषेतील रोमँटिक अॅक्शन चित्रपट आहे. जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटात श्रॉफने मुख्य भूमिकेत पदार्पण केला. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल होते. प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आणि श्रॉफला एक आघाडीचा बॉलीवूड अभिनेता म्हणून स्थापित केले.
१९८० च्या दशकात तेलुगू आणि कन्नड भाषेत त्याची पुनर्निर्मिती करण्यात आली आणि २०१५ मध्ये बॉलीवूडमध्ये त्याच शीर्षकाने पुनर्निर्मिती झाली. तमिळ रिमेकची योजना होती, परंतु नंतर ती रद्द करण्यात आली.
हीरो (१९८३ चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!