रामदेव

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

राम किसन यादव ( १९६५), हे एक भारतीय योगगुरू आणि उद्योगपती आहेत. अनुयायांमध्ये बाबा रामदेव म्हणूनही ओळखले जातात. ते प्रामुख्याने योग आणि आयुर्वेद भारतात लोकप्रिय करण्यासाठी ओळखले जातात. रामदेव 2002 पासून मोठ्या योग शिबिरांचे आयोजन आणि आयोजन करत आहेत. विविध टीव्ही चॅनेलवर त्यांचे योग वर्ग प्रसारित करत आहेत. त्यांनी त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांच्यासोबत पतंजली आयुर्वेद लिमिटेडची सह-स्थापना केली.

2010 मध्ये, त्यांनी 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. परंतु, अलीकडे ते भाजप या सत्ताधारी पक्षाचे समर्थक बनले आहेत. आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून ते नेहमी भाजप सरकारची बाजू मांडून समर्थन करत असतात. त्यासाठी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते.

राजकारण आणि चालू घडामोडींवर ते भाष्य करत असतात. अलीकडे त्यांनी कोरोना विषाणूवर औषध शोधल्याचा दावा केला होता. पण नंतर ते पूर्णपणे बदलले. त्यांच्या या खोट्या दाव्यासाठी प्रचंड टीका झाली.

त्यांनी नवीन वैद्यकीय शास्त्र (ऍलोपथी) हे "बावळट विज्ञान" आहे असे वक्तव्य केले होते. (त्यांचे मूळ शब्द: "Stupid Science" होते). यावरही त्यांच्यावर देशभर टीका झाली. तसेच आय.एम्.ए कडून रामदेववर कडक कारवाई करण्याची मागणी केली गेली. नंतर उत्तर देताना रामदेव म्हणाले, "त्यांचा बाप पण मला अटक करु शकत नाही." अनेक डॉक्टरांनी तीव्र निषेध केला. एकूण प्रकरणावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →