न्यू झीलंड क्रिकेट संघाने दोन कसोटी सामने खेळण्यासाठी जून २०२१ मध्ये इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडविरुद्धची मालिका झाल्यानंतर न्यू झीलंडने भारताबरोबर कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंडमधेच खेळला. न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने इंग्लंड मालिका आणि कसोटी विश्वचषक अंतिम सामन्यासाठी एकच संघ निवड केली.
पहिली कसोटी अनिर्णित सुटली. न्यू झीलंडचा डेव्हन कॉन्वेने कसोटी पदार्पणातच द्विशतक ठोकले. लॉर्ड्स मैदानावर असा विक्रम करणारा डेव्हन कॉन्वे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासातला पहिला खेळाडू ठरला. केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्याने टॉम लॅथमला दुसऱ्या कसोटीकरता न्यू झीलंडचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. दुसरी कसोटी ८ गडी राखून जिंकत न्यू झीलंडने १९९९ नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली. तसेच २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका हरल्यानंतर इंग्लंडला प्रथमच मायदेशात कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.