नोव्हा स्कॉशिया

यामागील विज्ञान आणि इतिहास.

नोव्हा स्कॉशिया

नोव्हा स्कॉशिया (Nova Scotia; फ्रेंच: Nouvelle-Écosse; लॅटिन अर्थ: नवा स्कॉटलंड) हा कॅनडा देशाचा अतिपूर्वेकडील एक प्रांत आहे. नोव्हा स्कोशिया एका द्वीपकल्पावर वसला असून त्याच्या तीन बाजूंना अटलांटिक महासागर आहे. केप ब्रेतॉन द्वीप तसेच इतर अनेक लहान बेटे नोव्हा स्कॉशियाच्या प्रशासनाखाली आहेत. ५५,२८४ चौरस किमी (२१,३४५ चौ. मैल) इतके क्षेत्रफळ असलेला नोव्हा स्कोशिया प्रिन्स एडवर्ड आयलंड खालोखाल कॅनडाचा आकाराने दुसरा सर्वात लहान प्रांत आहे. २०११ साली नोव्हा स्कॉशियाची लोकसंख्या ९.२१ लाख होती. हॅलिफॅक्स ही नोव्हा स्कॉशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

१ जुलै १८६७ रोजी कॅनडा देश स्थापन करणारा नोव्हा स्कॉशिया हा ऑन्टारियो, क्वेबेक व न्यू ब्रुन्सविक सोबत चार पैकी एक प्रांत होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →