टार्टन दिन हा कॅनडा आणि अमेरिकेत पूर्वी स्थलांतरित झालेल्या स्कॉटलंडच्या नागरिकांकडून दरवर्षी एप्रिल ६ रोजी साजरा करण्यात येणारा एक दिवस आहे. या दिवशी १३२० साली आर्बोआथचा तह संमत झाला होता.
हा उत्सव १९८० च्या दशकात कॅनडात सुरू झाला आणि नंतर कॅनडातील इतर शहरांतून तसेच अमेरिकेत पसरला.
ऑस्ट्रेलियामध्ये टार्टन दिन १ जुलै रोजी साजरा केला जातो. १७४७मध्ये या दिवशी ॲक्ट ऑफ प्रोस्क्रिप्शन या कायद्यातहत टार्टन घालण्यावरील बंदी उठविण्यात आली होती.
टार्टन दिनाला पाइप बँड आणि हायलॅंड नाचांस सह मिरवणूका निघतात तसेच इतर स्कॉटलंडकेंद्री कार्यक्रम आयोजित केले जातात.
टार्टन दिन
थोडक्यात पण महत्त्वाचे.