नेपाळ राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी नोव्हेंबर २०२१ दरम्यान कतारचा दौरा केला. दोन्ही संघांची ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती. २०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेसाठी नेपाळ संघाचा सराव व्हावा म्हणून ही मालिका आयोजीत केली गेली. सर्व सामने दोहा मधील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे खेळवण्यात आले.
नेपाळने पहिल्या ट्वेंटी२० सामन्यात ११९ धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. पुढील दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत नेपाळ महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली.
नेपाळ महिला क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२१-२२
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?