नॅशनल टी२० चषक तथा फैसल बँक टी२० चषक ही पाकिस्तानमधील पुरुषांची व्यावसायिक देशांतर्गत ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धा आहे. २००५ मध्ये सुरू झालेली ही जगातील सर्वात जुन्या ट्वेंटी-२० क्रिकेट लीगपैकी एक आहे. २०१६ मध्ये पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) ही फ्रँचायझी स्पर्धा सुरू होईपर्यंत ही पाकिस्तानमधील मुख्य टी२० स्पर्धा होती. २०१९-२० पासून या स्पर्धेत सहा प्रादेशिक संघ सहभागी होत आहेत. पूर्वी विविध शहरे, जिल्हे आणि क्षेत्रीय क्रिकेट संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे संघ यात खेळत असत.
या लीगचे मुख्य कार्यालय आणि नियोजन केंद्र लाहोर येथील गद्दाफी स्टेडियममध्ये आहे. लाहोर ब्लूज २०२४-२५ च्या हंगामाचा या स्पर्धेचा विजेता आहे. त्यांनी अंतिम सामन्यात पेशावरला हरवले.
२००४-०५ च्या पहिल्या हंगामात झाली या स्पर्धेला एबीएन-अॅम्रो ट्वेंटी-२० चषक असे नाव होते. अल्पावधीतच १४ संघांसह ही पाकिस्तानमधील प्रमुख क्रिकेट लीग झाली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडबाहेर सुरू झालेली ही जगातील पहिली टी२० क्रिकेट लीग होती.
कालांतराने या स्पर्धेचे नाव प्रायोजकांनुसार बदलत गेले. २००८-०९ मध्ये आरबीएस ट्वेंटी-२० कप, २०१०-११ मध्ये फैसल बँक ट्वेंटी-२० चषक आणि २०१४-१५ मध्ये हायर टी२० कप अशी नामांतरे झाली. या स्पर्धेच्या इतिहासात ६ विजेतेपदांसह सियालकोट स्टॅलियन्स हा सर्वात यशस्वी संघ आहे.
स्पर्धेचे स्वरूप आणि सहभागी संघांची संख्या पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेट रचनेनुसार वारंवार बदलत राहिली आहे. साधारणपणे या स्पर्धेत साखळी फेरी बाद फेरी असतात. ही स्पर्धा पाकिस्तानमधील युवा खेळाडूंसाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली आहे.
नॅशनल टी२० चषक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.