नील कमल हा १९६८ चा राम महेश्वरी दिग्दर्शित भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक थरारपट आहे. ह्यात वहीदा रेहमान, राज कुमार, मनोज कुमार, मेहमूद, बलराज साहनी, ललिता पवार आणि शशिकला यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
नील कमलला रिलीज होताच समीक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर तो एक मोठा व्यावसायिक यश ठरला. हा १९६८ चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.
१६ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, नील कमलला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (माहेश्वरी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (राज कुमार), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (शशिकला) आणि सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार (मेहमूद) यासह ८ नामांकने मिळाली. वहिदा रेहमानने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला जो त्यांनी आधी गाईड (१९६५) चित्रपतासाठी पण मिळवला होता.
नील कमल (१९६८ चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.