गुरू दत्त टीम

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

गुरू दत्त टीम किंवा गुरू दत्त ए-टीम (गुरुदत्त टीम) हा गुरू दत्त यांनी त्यांच्या काही चित्रपटांसाठी तयार केलेला चित्रपट निर्मात्यांचा एक गट होता. या टीमने तयार केलेल्या काही प्रसिद्ध चित्रपटांमध्ये प्यासा (१९५७), कागज के फूल (१९५९), चौदहवी का चांद (१९६०), आणि साहिब बीबी और गुलाम (१९६२), यांचा समावेश आहे. २००५ मध्ये टाइम या नियतकालिक तर्फे प्यासा या चित्रपटाला सर्वकाळातील शीर्ष १०० चित्रपटांमध्ये स्थान देण्यात आले होते.

त्यांचे बहुतेक चित्रपट हे बनल्यानंतर त्यांना खूप उशिरा समीक्षकांची दाद मिळाली. कागज के फूल सारखे चित्रपट हे व्यावसायिकदृष्ट्या मोठे अपयशी ठरले होते. परंतु १९८० च्या दशकात युरोपमध्ये हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आल्यावर समीक्षकांची दाद आणि व्यावसायिक पातळीवर मोठी लोकप्रियता मिळाली. दत्त यांचे फ्रान्स, जर्मनी आणि जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत, जिथे त्यांच्या चित्रपटांचे महोत्सव वेळोवेळी आयोजित केले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →