निर्मला श्रीवास्तव ऊर्फ निर्मला देवी (२१ मार्च, इ.स. १९२३:छिंदवाडा, मध्य प्रदेश - २३ फेब्रुवारी, इ.स. २०११: जेनोवा, इटली) या सहजयोग ध्यान साधनातंत्राच्या आणि एका नव्या धार्मिक व आध्यात्मिक चळवळीच्या संस्थापक होत्या. त्यांचे अनुयायी त्यांना माताजी या नावाने संबोधत. त्यांचा जन्म साक्षात्कारी अवस्थेतच झाला असल्याची श्रद्धा आहे. 'सहजयोग या ध्यानसाधनेद्वारे लोकांनी आपला आत्मसाक्षात्कार साधावा, यासाठी आणि सह्जायोगाद्वारे जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी निर्मला देवी यांनी आपले सारे आयुष्य व्यतीत केले. सहजयोग शिकवण्यासाठी त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही. १४० देशांत त्यांनी निःशुल्क सेवा दिली.. निर्मला देवी यांनी चले जाव चळवळीत तुरुंगवास भोगला होता. गांधीजी त्यांना प्रेमाने नेपाली या नावाने हाक मारीत.
निर्मला देवी यांनी सहजयोगाच्या माध्यमातून अनेक बिगरसरकारी सामाजिक संस्था उभ्या केल्या. त्यांच्या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.
निर्मला श्रीवास्तव
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.