निर्मला गोगटे

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

निर्मला गोगटे (माहेरच्या निर्मला बापट, जन्म : १९३६ - ) या एक पुण्यात राहणाऱ्या शास्त्रीय संगीत गायिका व अभिनेत्री आहेत. सी.आर. व्यास, बी.आर. देवधर, जी.डी. अग्नी, व्ही आर. आठवले यांसारख्या दिग्गज गायकांच्याकडे त्या गायन शिकल्या. नाट्यसंगीतासाठी त्यांना कृष्णराव चोणकर, गोविंदराव पटवर्धन आणि पुरुषोत्तम वालावलकर यांसारखे गुरू लाभले. मराठी आणि संस्कृत रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांच्या नाट्यसंगीत गायनासाठी त्या नावाजल्या गेल्या आहेत.

रेडिओ आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांव्यतिरिक्त गोगटे यांनी भारताप्रमाणेच अमेरिकेतही गायनाचे जाहीर कार्यक्रम केले आहेत.

महाराष्ट्राच्या नव्या विधान भवनाचे जेव्हा इंदिरा गांधी यांनी मुंबईत १९८१ साली उद्घाटन केले, तेव्हा त्या कार्यक्रमात गाणे सादर करावयाचा मान निर्मला गोगटे यांना मिळाला होता.

निवृत्त स्थापत्य अभियंता मधुकर नारायण गोगटे हे निर्मला गोगटे यांचे पती आहेत. मधुकर गोगटे अनेक वर्षे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. पुण्यातील इंजिनिअर्स असोसिएशनचेही ते पदाधिकारी होते. त्यांनी असोसिएशनच्या सभागृहात बांधकाम या विषयावरील अनेक वैचारिक व्याख्याने नियमितपणे आयोजित केली आहेत. भारतीय भाषांसाठी रोमन लिपीचा पुरस्कार करण्याचे कार्य ते सन १९६६पासून करीत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →