अशोक गणेश परांजपे (जन्मदिनांक अज्ञात - एप्रिल ९, इ.स. २००९) हे मराठी गीतकार होते. ते मुंबई येथे महाराष्ट्र राज्य लोककला संचालनालयाचे संचालक होते. त्यानंतर ते औरंगाबादला स्थायिक झाले होते.
अशोक परांजपे यांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी, गण-गवळण आणि नाट्यगीत या प्रकारची गीते लिहिली. इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी) रिसर्च सेंटरचे त्यांचे काम सुरू असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये जाउन तेथील लोककलावंतांच्या लोककलेच्या ध्वनिफिती तयार केल्या. त्या संदर्भात परांजपेंनी १९९२मध्ये पंढरपूर भक्तिसंगीत महोत्सव आणि १९८६मध्ये आनंदवन येथील महाराष्ट्र आदिवासी कला महोत्सव, असे दोन महोत्सव आयोजित केले. या कामाची नोंद फोर्ड फाउंडेशनने घेतली आणि ऑस्ट्रियातल्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हिडिओग्राफी (आयओव्ही) या आंतरराष्ट्रीय लोककला संस्थेने परांजपे यांना सभासदत्व दिले. त्यानंतर अशोक परांजपे यांनी अनेक मराठी कलावंतांना फ्रान्स, आयर्लंड, जपान आदी देशांत नेऊन तेथे त्यांना कला सादर करण्याची संधी मिळवून दिली.
अशोक परांजपे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.