निखिता गांधी (जन्म: १ ऑक्टोबर १९९१) ही एक भारतीय पार्श्वगायिका आहे जिने पाच वेगवेगळ्या भाषांमधील भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने तमिळ, हिंदी, तेलुगू, बंगाली आणि कन्नड चित्रपट प्रकल्पांमध्ये काम केले आहे.
तिने दीपिका पडुकोण साठी राब्ता चित्रपटाचे शीर्षकगीता गायले. जग्गा जासूस या चित्रपटातील अरिजित सिंगसोबत तिचे "उल्लू का पट्ठा" हे युगल गाणे हिट झाले आहे. तिने सचिन: अ बिलियन ड्रीम्स, जब हॅरी मेट सेजल, केदारनाथ, लुका चुप्पी, सूर्यवंशी आणि टायगर ३ यासह अनेक हिंदी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. तिने लिओ, वारिसु, कॉकपिट आणि किश्मिश सारख्या चित्रपटांमधील बंगाली आणि तमिळ गाणी देखील गायली आहेत. तिची "आओ कभी हवेली पे" आणि "पोस्टर लगवा दो" ही गाणीही लोकप्रिय झाली. बादशाहसोबतचे "जुगनू" हे गाणे खूपच व्हायरल झाले.
निखिता गांधी
या विषयातील रहस्ये उलगडा.