ज्योतिका टांगरी ही एक भारतीय पार्श्वगायिका आहे. ती शादी में जरूर आना (२०१७) या हिंदी चित्रपटामधील "पल्लो लटके", टोटल धमाल (२०१९) मधील "मुंगडा" आणि बाजरे दा सिट्टा (२०२२) मधील "सुरमेदानी" या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. बहन होगी तेरी (२०१७) मधून तिने "जय माँ" मधून पार्श्वगायनात पदार्पण केले. तिने हाफ गर्लफ्रेंड (२०१७), शादी में जरूर आना (२०१७), आणि फुक्रे रिटर्न्स (२०१७) यांसारख्या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. २०१८ मध्ये तिला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा झी सिने पुरस्कार मिळाला. तिला पंजाबी संगीत उद्योगातील "कांडा कचेया", "जिने साह", आणि "सारी रात" सारख्या गाण्यांसाठी देखील ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ज्योतिका टांगरी
यामागील विज्ञान आणि इतिहास.