निकाह हा १९८२ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक नाट्य चित्रपट आहे जो बी.आर. चोप्रा निर्मित आणि दिग्दर्शित आहे.
या चित्रपटात राज बब्बर, दीपक पराशर आणि सलमा आगा यांनी भूमिका केल्या आहे. आगाचा हा बॉलीवूड चित्रपटातील पदार्पणाचा चित्रपत आहे. या चित्रपटात असरानी आणि इफ्तेखार यांनी सहाय्यक भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाचे संगीत रवी यांनी दिले होते आणि ते खूप गाजले. चित्रपटाचे मूळ नाव तलाक तलाक तलाक होते, परंतु इस्लामी धर्मगुरूंच्या आग्रहावरून त्याचे नाव निकाह असे ठेवण्यात आले.
या चित्रपटाला १९८२ मध्ये सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी फिल्मफेर पुरस्कार मिळाला. १९८२ मधील हा सहावा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट होता.
चित्रपटाचा मोठा भाग हैदराबादमधील अनेक ठिकाणी चित्रित करण्यात आला आहे - उस्मानिया विद्यापीठ, नेकलेस रोड (हुसेन सागर), चारमिनारजवळील सरकारी निजामिया तिब्बी कॉलेज, सार्वजनिक उद्यानातील शाही मशीद आणि रवींद्र भारती सभागृह.
निकाह (१९८२ चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!