निओकॅरिडीना डेव्हिडी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

निओकॅरिडीना डेव्हिडी

निओकॅरिडीना डेव्हिडी हा तैवानमधे सापडणारा, गोड्या पाण्यात राहणारा आणि शोभिवंत मत्स्यपालन छंदात लोकप्रिय असणारा असा एक श्रींप (मराठीमध्ये 'कोळंबी' असे म्हणतात परंतु, मराठी मत्स्यपालन छंदोपासकही 'श्रींप' असेच संबोधत असल्यामुळे, पुढील लेखात 'श्रींप' असा उल्लेख केला जाईल) आहे. निसर्गात सापडणारा निओकॅरिडीना डेव्हिडी हा तपकिरी-हिरव्या रंगाचा असतो. शोभिवंत मत्स्यपालन छंदात हा श्रींप लाल, पिवळा, केशरी, हिरवा, निळा, जांभळा, काळा इत्यादी रंगात मिळतो, पण, लाल रूपिका (morph) असलेला चेरी श्रींप अधिक प्रमाणात विकला जातो. प्रौढ श्रींपच्या रंगाची घनता कशी असेल हे त्या-त्या रंगाच्या श्रींपचे प्रजनन कसे घडवून आणले आहे (selective breeding), यावर अवलंबून असते, यातूनच त्यांची विक्री किंमत आणि "गुणवत्ता" (ग्रेडिंग) निश्चित केली जाते. "गुणवत्ता" ठरवताना सौंदर्य, आकार, वर्तन आणि वाणानुसार कमी-अधिक असणारी इतर वैशिष्ट्ये यांना विचारात घेतले जाते. पूर्ण वाढलेला श्रींप ४ सेंटीमीटर (१.६ इंच) आकाराचा असतो. या श्रींप प्रजातीला ६.५ ते ८ पीएच आणि १४–२९ °से (५७–८४ °फॅ) तापमान असणारे शुद्ध पाणी लागते. २२ °से (७२ °फॅ) तापमान हे या श्रींपसाठी सर्वोत्तम मानले जाते. निओकॅरिडीना डेव्हिडी सर्वभक्षी (omnivores) आहे. १ ते २ वर्षे ही यांची आयुर्मर्यादा आहे. पूर्वी या श्रींपचे वर्गीकरण निओकॅरिडीना हेटरोपोडा आणि निओकॅरिडीना डेन्टिक्युलाटा सायनेन्सिस असे करण्यात आले होते परंतु, आता निओकॅरिडीना डेव्हिडी हे नाव प्रजातींच्या सर्वात जुन्या प्रसिद्ध वर्णनावरून निश्चित करण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →