पं. नारायणराव बोडस (जन्म : कराची, १ जानेवारी, १९३२; - पुणे, २७ नोव्हेंबर, इ.स. २०१७|२०१७) हे ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक होते.
बोडस यांचे संगीतशिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच, प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. 'सौभाग्यरमा' या डॉ. बी.एन. पुरंदरे लिखित नाटकापासून गायक नट म्हणून त्यांच्या कारकिदीर्ची सुरुवात झाली. नोकरी करीत असताना त्यांनी शास्त्रीय गायनाचा रियाज सुरू ठेवला. दाजी भाटवडेकर यांनी संगीत शारदम् या संस्कृत नाटकासाठी त्यांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्या अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. संस्कृत नाटक संगीत सौभद्रम्, पासून ते मराठी नाटके - 'पती गेले गं काठेवाडी', 'बुद्ध तिथे हरला', 'सं. मृच्छकटिक', 'सं. महाश्वेता', 'सं. मानापमान', 'सं. स्वयंवर', 'सं. सौभद्र', 'सं. संशयकल्लोळ' अशा अनेक संगीत नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. ते रागदारी गायक असूनही त्यांनी नाटकातील गाण्याचा बाज सोडला नाही.
वयाची साठी पूर्ण झाल्यावर १९९३ साली नारायणरावांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली. त्या वर्षी गोव्यात त्यांनी ‘‘संगीत सौभद्र‘’चा अखेरचा प्रयोग केला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. १२ वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांनी संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर २००६पासून ते वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करीत होते.
नारायणराव बोडस
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!