अरविंद पिळगावकर (जन्म : १८-१०-१९३७) हे मराठी नाट्यअभिनेते आहेत. मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले तर डॉ. दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांकडून नाट्यशास्त्राचे धडे घेतले. १९६४ साली त्यांनी ’यशवंतराव होळकर’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. ते गायक नट आहेत. ’साहित्य संघ’ आणि ’विद्याधर गोखले प्रतिष्ठान’ या संस्थांत ते संगीत नाट्यप्रशिक्षक म्हणून ते काम करीत असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरविंद पिळगावकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.