नारायण सदोबा काजरोळकर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

नारायण सदोबा काजरोळकर (?? - इ.स. १९८३) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पहिल्या लोकसभेत, तिसऱ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून आणि चौथ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.

त्यांनी १९५२ च्या पहिल्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर यांचा १५,००० मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीआधी काजरोळकर आंबेडकरांचे स्वीय सहाय्यक होते. १९६२ च्या निवडणुकीत ते त्याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले..

काजरोळकर यांचा जन्म अनुसूचित जाती जमातीमध्ये झाला होता. अनुसूचित जाती समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्ती म्हणून त्यांना १९५३ च्या पहिल्या मागासवर्ग आयोगाचे सदस्य नेमल्या गेले. मागासवर्गीय लोकांची संघटना असलेल्या दलित वर्ग संघाचे ते सदस्य होते आणि त्यांनी ५ एप्रिल १९५३ रोजी जगजीवन राम यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी समितीचे सचिव म्हणून काम केले. समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९७० मध्ये पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.

इस १९८३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →