नागानो

या विषयावर तज्ञ बना.

नागानो

नागानो (जपानी: 長野市) हे जपान देशामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर जपानच्या होन्शू बेटावर वसले असून ते नागानो ह्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. सातव्या शतकामधील झेन्को-जी नावाच्या बौद्ध मंदिरासाठी नागानो प्रसिद्ध आहे. २०११ साली नागानोची लोकसंख्या सुमारे ३.८७ लाख होती.

नागानो हे १९९८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमान शहर होते. जपानच्या शिनकान्सेन द्रुतगती रेल्वेजाळ्यामधील होकुरिकू शिनकान्सेन हा मार्ग नागानोला राजधानी तोक्यो सोबत जोडतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →