नागपूर आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन ही नागपूर इथे आयोजीत केली जाणारी वार्षिक आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन स्पर्धा आहे. ही स्पर्धा साधारणतः जानेवारी महिन्याच्या शेवट्याच्या आठवड्यात महात्मा गांधी पुण्यतिथीच्या (हुतात्मा दिन) आसपास अहिंसा दिवस आयोजन समितीद्वारा आयोजीत केली जाते. न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व नागपुरचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी या समितीची स्थापना २००७ मध्ये केली होती. या स्पर्धेची सुरुवात इ.स. २००९ सालापासून करण्यात आली असून इ.स. २०१० हे या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. मी धावतो शांतता आणि अहिंसेच्या संस्कृतीसाठी हे या स्पर्धेचे घोषवाक्य आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नागपूर आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.