मॅरॅथॉन म्हणजे लांब पल्ल्याची, धावण्याची शर्यत किंवा धावणे. ह्या पूर्ण लांबीच्या शर्यतीचे अंतर असते ४२.१९५ किमी किंवा २६ मैल ३८५ यार्ड. ह्या शर्यतीमध्ये, सर्वसाधारणपणे, रस्त्यांवरूनच धावतात. मॅरॅथॉन शर्यत ही प्रमुख रस्त्यांवरून घेतली जाते. रहदारीच्या मार्गाचा अडथळा होत असल्यास अथवा अन्य कारणांमुळे हे शक्य होत नसेल तर रस्त्याच्या बाजूस असलेल्या सायकल मार्गावरून (फूटपाथ) घ्यावी लागते. मात्र गवताळ मार्गावरून ही शर्यत घेतली जात नाही. शर्यतीची सुरुवात व शेवट क्रीडांगणावर घेतली जाते. सर्व स्पर्धकांना दिसेल अशा रितीने किलोमीटर व मैल अंतराचे फलक शर्यतीच्या रस्त्यावर लावलेले असतात. शर्यतीच्या सुरुवातीपासून पाच किलोमीटर अंतरावर खेळाडूंना खाद्य पदार्थ व पेय मिळण्याचे ठिकाण असते. त्या पुढे तशीच व्यवस्था पाच किलोमीटर वर केलेली असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मॅरॅथॉन
यामागील विज्ञान आणि इतिहास.