विविध प्रकारच्या खाण्यायोग्य झाडाच्या बीया, शेतात लागवड करून, त्यापासुन मनुष्यास अन्न वा व्यापारासाठी अनेकपटीत उत्पादिलेल्या बीयांना धान्य म्हणतात. जसे-गहु, तांदुळ, मका, ज्वारी, बाजरी इत्यादी.टरफल किंवा फळाच्या थरासह किंवा शिवाय असलेली मानवी किंवा प्राणी वापरासाठी कापणी केलेली लहान, कडक, कोरडी बी म्हणजे धान्य. धान्य पीक म्हणजे धान्य निर्मिती करणारी वनस्पती. व्यावसायिक धान्य पीकाचे मुख्य दोन प्रकार म्हणजे तृणधान्ये आणि शेंग.
कापणी झाल्यानंतर, कोरडी धान्ये ही इतर मुख्य अन्नापेक्षा जास्त टिकाऊ असतात, जसेकी स्टार्ची फळे (प्लेनटेन्स, ब्रेडफ्रुट इ.) आणि कंद (गोड बटाटा, कसावा, आणि बरेच). या टिकाऊपणामुळे धान्य औद्योगिक शेतीसाठी सोयीस्कर आहे, कारण त्याची यांत्रिकदृष्ट्या कापणी होऊ शकते, रेल्वे किंवा जहाजाने वाहतूक होऊ शकते, कोष्ठागारामध्ये दिर्घकाळासाठी साठवणूक होऊ शकते, आणि गिरणीत पीठ केले जाऊ शकते किंवा तेल काढले जाऊ शकते. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात जागतिक सामग्री बाजारांचे अस्तित्त्व हे मका, तांदूळ, सोयाबीन, गहू आणि इतर धान्यांसाठी असते परंतु कंद, भाजीपाला किंवा इतर पीकांसाठी नसते.
धान्य
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?