फुलझाडांमध्ये परागीकरण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रूपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय. वनस्पतीशास्त्रात, पुष्पनानंतर अंडाशयामधून सपुष्प वनस्पतींमध्ये (ज्याला आवृतबीज सुद्धा म्हणतात) तयार झालेली बिया असलेली रचना म्हणजे फळ.
सामान्य भाषेच्या वापरात, "फळ" म्हणजे वनस्पतीची रसाळ बिया-संबंधित रचना जे गोड किंवा तुरट असते, आणि कच्च्या स्थितीत खाल्ले जाऊ शकतात, जसेकी सफरचंद, केळ, द्राक्ष, लिंबू, संत्री आणि स्ट्रॉबेरी. दुसऱ्या बाजूने, वनस्पतीशास्त्रीय वापरात, "फळ" मध्ये बऱ्याच रचना समाविष्ट असतात ज्याला सामान्यपणे "फळे" म्हटल्या जात नाही, जसेकी शेंगा, कणिस, टोमॅटो आणि गहू. बीजाणू निर्माण करणाऱ्या कवकाच्या भागाला झाडाचे फळधारी अंग असे सुद्धा म्हणतात.
फळामध्ये बिया असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. प्राणी व पक्ष्यांद्वारे बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड गर असतो. त्याचा अन्न म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या विष्टेद्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. फळे विविध प्रकारची असतात. आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, पपई, केळ, कलिंगड, काकडी ही काही फळांची उदाहरणे आहेत. फळ हे आरोग्यासाठी उपयोगी आहे. फळे खाल्याने ऊर्जा मिळते. फळांचा राजा म्हटल्यावर आंबा या फळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
फळ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.