धवलक्रांती किंवा ऑपरेशन फ्लड हा १३ जानेवारी १९७० रोजी सुरू करण्यात आलेला जगातील सर्वात मोठा डेरी विकास कार्यक्रम होता. हा भारताच्या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचा (NDDB) एक महत्त्वाचा प्रकल्प होता. या क्रांतीने भारताला दुधाची कमतरता असलेल्या राष्ट्रातून १९९८ मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला मागे टाकून, २०१८ मध्ये सुमारे २२.२९ टक्के इतक्या जागतिक दूधाचा उत्पादक देश बनवले. ३० वर्षांच्या आत भारतातील प्रति व्यक्ती उपलब्ध दूध दुप्पट झाले आणि दुग्धव्यवसाय हा भारतातील सर्वात मोठा स्वयं-शाश्वत ग्रामीण रोजगार निर्माण करणारा व्यवसाय बनला. शेतकऱ्यांना त्यांच्या विकासाचे मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांनी तयार केलेल्या संसाधनांवर नियंत्रण देण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला गेला. या क्रांतीने केवळ मोठ्या प्रमाणावर उत्पादनच नाही, तर जनसामान्यांच्या उत्पादनात वाढ झाली; म्हणून या प्रक्रियेला "श्वेत क्रांती" असे संबोधले जाते.
अमूलचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. वर्गीस कुरियन यांची पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी NDDB चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. कुरियन यांनी कार्यक्रमाला यश मिळवून दिले आणि तेव्हापासून ते धवलक्रांतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. जर भारताच्या संघटित दुग्ध उद्योगात क्रांती घडवून आणणारी तांत्रिक प्रगती असेल तर ती म्हणजे म्हशीच्या दुधापासून स्किम मिल्क पावडर बनवणे. ज्या माणसाने हे शक्य केले ते हरिचंद मेघा दलाया होत. अमूल या डेरी सहकारी संस्थेचा आनंद पॅटर्न प्रयोग हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागील इंजिन होते.
धवल क्रांती
थोडक्यात पण महत्त्वाचे.