धर्मेश तिवारी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

धर्मेश तिवारी (२७ एप्रिल १९५१-६ ऑगस्ट २०१४) हे भारतीय अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक होते. ते दूरचित्रवाणी मालिका महाभारतमध्ये कृपाचार्य आणि चाणक्यमध्ये मलयराजच्या भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

त्यांनी हिंदी दूरचित्रवाणी मालिका कानूनमध्ये न्यायाधिशाची भूमिका साकारली.

त्यांनी २०१३ मध्ये महाभारत और बर्बरीक या मालिकेसाठी दिग्दर्शन व पटकथा लेखन केले. हा त्यांचा शेवटचा प्रकल्प होता.

२००१ मध्ये, ते चित्रपट व दूरचित्रवाणी कलाकार संघटनेचे मानद महासचिव होते.

२००३ मध्ये, ते पश्चिम भारत चित्रपट कर्मचारी संस्था, या चित्रपट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष होते.

२०१३ मध्ये धर्मेश यांनी प्रधानमंत्री या राजकीय कार्यक्रमाच्या एबीपी न्यूझ वाहिनीच्या २६ भागाच्या मालिकेत जसवंत सिंहची भूमिकासुद्धा साकारली.

१० ऑगस्ट २०१४ला ‌वयाच्या ६३ व्या वर्षी तिवारी यांचा मधुमेहाने मृत्यू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →