या पद्धतीत सर्व संख्या ० आणि १ या अंकांचा वापर करून लिहिल्या जातात. त्यामुळे, १ हा या पद्धतीतील सर्वात मोठा अंक आहे. उदाहरणार्थ, दशमान पद्धतीतील १० व ३ हे द्विमान पद्धतीत १०१० व ११ असे लिहतात. संगणक शास्त्रात, संगणकाला समजेल अशा भाषेत संदेश देण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. द्विमान पद्धतीत अंकाच्या स्थानांची किंमत २ च्या पटीत वाढते. ११०१० या द्विमान संख्येची फोड : १*१६+१*८+०*४+१*२+०*१ = २६ (दशमान) अशी होते. अशाप्रकारे द्विमानातल्या कोणत्याही संख्येचे दशमानात रूपांतर करणे सोपे आहे. १००११० या द्विमान संख्येचे रूपांतर १*२५ + ०*२४ + ०*२३ + १*२२ + १*२१ + ०*२० = ३२ + ४ + २ = ३८ (दशमान) असे होते.
हे सुद्धा पहा
पंचमान पद्धत
दशमान पद्धत
रोमन पद्धत
द्विमान पद्धत
यामागील विज्ञान आणि इतिहास.