देव पटेल (२३ एप्रिल, १९९०:हॅरो, लंडन, इंग्लंड - ) हा एक ब्रिटिश अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. ब्रिटीश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि अकादमी पुरस्कार आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकनांसह त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. टाइमच्या २०२४मधील जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पटेल यांचा समावेश करण्यात आला होता.
पटेलने आपल्या कारकिर्दीची दूरचित्रवाणीमालिका स्किन्स (२००७) मध्ये अन्वर खररलची भूमिका केली. डॅनी बॉईलच्या स्लमडॉग मिलियोनेर (२००८) या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. द बेस्ट एक्झोटिक मॅरीगोल्ड हॉटेल (२०११) आणि द सेकंड बेस्ट एक्झोटिक मॅरीगोल्ड हॉटेल (२०१५) यांत त्याने भूमिका केल्या.
२०१६ च्या लायन चित्रपटातील भूमिकेसाठी, पटेल यांनी सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार जिंकला आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांने हॉटेल मुंबई (२०१८), द पर्सनल हिस्ट्री ऑफ डेव्हिड कॉपरफिल्ड (२०१९) आणि द ग्रीन नाइट (२०२१) या स्वतंत्र चित्रपटांमध्ये काम केले आणि मंकी मॅन (२०२४) या थरारपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले.
पटेल यांचा जन्म २३ एप्रिल, १९९० रोजी लंडनच्या हॅरो भागात झाला. त्याचे आईवडील नैरोबीमध्ये जन्मलेले आणि भारतीय वंशाचे आहेत. हे दोघे गुजराती असून किशोरवयात वेगवेगळ्या मार्गे युनायटेड किंग्डमला स्थलांतरित झाले. पटेल हिंदू धर्मात वाढले होते. तो मोडकेतोडके गुजराती बोलतो. त्यांचे पूर्वज भारतातील गुजरात राज्यातील जामनगर आणि उंझा येथून आले होते.
देव पटेल
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.