देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची हा एक मराठी चित्रपट असून २१ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे स्वामी समर्थांच्या भूमिकेत तर स्नेहल तरडे या शेतकरी महिलेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यावंशी यांनी वटवृक्ष एण्टरटेन्मेंट बॅनर खाली सांभाळली.
या चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे हा असून, या चित्रपटाची कमाई शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केली. आत्महत्या केल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसून, वर्तमान परिस्थितीनुसार शेतीत आणि शेतकऱ्यांत बदल करण्याची गरज आहे, असा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून दिला गेला आहे. या चित्रपटात स्वामी समर्थ शेतकरी महिलेसोबत शेतात, दऱ्याखोऱ्यांमध्ये, एसटीने प्रवास करत तिचे समुपदेशन करताना दिसत आहेत.
देऊळ बंद २
या विषयातील रहस्ये उलगडा.