दुर्गाबाई शिरोडकर या खुर्जा घराण्याचे गायक अझमत हुसेन खान यांच्या शिष्या होत्या. त्यांचा जन्म गोव्यातील शिरोडा गावी झाला. सुमन, मधुरा आणि उमाकांत या तीन मुलांच्या जन्मानंतर त्या मिरजेला राहिल्या. नंतर पुण्यात स्थायिक झाल्या. पुणे, मुंबई, लखनौ आणि दिल्लीमध्ये दुर्गाबाईंनी संगीताचे बरेच कार्यक्रम केले. यमन आणि ललत हे दुर्गाबाईंचे आवडते राग होते. बालगंधर्वांनी एकदा दुर्गाबाईंच्याकडे येऊन 'यमन' ऐकला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुर्गाबाई शिरोडकर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.