दीवची लढाई किंवा चौलची दुसरी लढाई ही फेब्रुवारी ३, इ.स. १५०९ रोजी लढली गेलेली आरमारी लढाई होती. अरबी समुद्रात दीव बंदराजवळ झालेल्या या लढाईत एका बाजूला पोर्तुगीज साम्राज्य तर विरोधात गुजरातचा सुलतान महमूद बेगडा, इजिप्तची मामलुक सुल्तानी, कोझिकोडचा राजा झामोरिन यांच्या युद्धनौका होत्या. एतद्धेशीय आरमाराला ऑट्टोमन साम्राज्य, व्हेनिस आणि रागुसाच्या प्रजासत्ताकाचे पाठबळ होते. या लढाईत पोर्तुगीजांचा निर्णायक विजय झाला व त्यांचा भारताला येण्याच्या समुद्रीमार्गातील अरब व भारतीय आरमारांचा अडसर दूर झाला. यानंतर पोर्तुगीजांनी भराभर पश्चिम भारतातील बंदरे काबीज केली व अरबी समुद्रावरील समुद्री वाहतूकीवर आपला वचक बसवला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दीवची लढाई
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.