दीव जिल्हा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दीव जिल्हा हा भारतातील दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या तीन जिल्ह्यांपैकी एक आहे. हा जिल्हा दीव बेट आणि गुजरात राज्याच्या सीमेवरील सिंबोर व गोगोला या दोन लहान भागांनी मिळून बनलेला आहे. जिल्ह्याचे मुख्यालय दीव शहरात आहे.

दीव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४० चौरस किमी (१५ चौ. मैल) आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार दीव जिल्ह्याची लोकसंख्या ५२,०७४ आहे, जी अंदाजे सेंट किट्स आणि नेव्हिस राष्ट्राच्या लोकसंख्येएवढी आहे. २००१-११ या दशकात त्याचा लोकसंख्या वाढीचा दर १७.७३% होता. दीवमध्ये दर १००० पुरुषांमागे १०३० स्त्रिया असे लिंग गुणोत्तर आहे, आणि साक्षरता दर ८३.३६% आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →