दिग्विजय नारायण सिंह

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

दिग्विजय नारायण सिंह (२१ नोव्हेंबर १९२४ — २ ऑगस्ट १९९१) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी होते. दिग्विजय हे भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेचे ६ वेळा सदस्य राहिले आहेत. ते सर्वप्रथम १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन बिहार राज्याच्या उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर मतदारसंघातून १ल्या लोकसभेचे सदस्य होते. तसेच सदस्य १९५७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच पपरी मतदारसंघातून २ऱ्या, १९६२ आणि १९६७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच मुझफ्फरपूर मतदारसंघातून ३ऱ्या व ४थ्या, १९७१ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन) पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून बिहार राज्याच्या हाजीपूर मतदारसंघातून ५व्या व अखेरीस १९७७ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय लोक दल पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून बिहार राज्याच्या वैशाली मतदारसंघातून ६व्या लोकसभेसे सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →