दादू इंदुरीकर (जन्म : मार्च १९२८; - १३ जून १९८०). यांचे खरे नाव गजानन राघू सरोदे असे होते. त्यांनी गाढवाचं लग्न हे वगनाट्य मराठी रंगभूमीवर आणले. या वगनाट्याला राष्ट्रपती पारितोषिक, संगीत नाट्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते.
‘कहाणी वगसम्राटाची’ हे दादू इंदुरीकर यांच्या जीवनाची वाटचाल सांगणारे पुस्तक आहे.
या वगात गंगीचे काम करणाऱ्या प्रभा शिवणेकर यांचे ‘एका गंगीची कहाणी’ नावाचे चरित्र प्रभाकर ओव्हाळ यांनी लिहिले आहे. पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनाने हे चरित्र पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे.
दादू इंदुरीकर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.