दाईम्यो (大名) हे शक्तिशाली जपानी सत्ताधारी, सरंजामदार होते. ज्यांनी १०व्या शतकापासून ते १९व्या शतकाच्या मध्यभागी मेइजी कालखंडापर्यंत जपानवर राज्य केले. त्यांच्या विशाल, वंशपरंपरागत विभागलेल्या भूमीवर ते राज्य करत होते. ते शोगुन आणि नाममात्र सम्राट आणि कुगेच्या अधीन होते. दाइम्यो हा शब्द, दाई (大) म्हणजे "मोठा" आणि मायो म्हणजे मायोडेन (名田), म्हणजे "खाजगी जमीन" या दोन शब्दांपासून बनला आहे.
दाईम्योचा इतिहास फार मोठा आणि विभिन्न आहे. याची सुरुवात मुरोमाची कालावधीतील शुगोपासून होते. ती इडो काळातील सेंगोकु पर्यंत पसरलेली आहे. दाईम्योची पार्श्वभूमीही बरीच वेगळी होती. काही दाईम्यो वंश, विशेषतः मोरी, शिमाझू आणि होसोकावा, इम्पीरियल घराण्याच्या कॅडेट शाखा होत्या किंवा कुगेचे वंशज होते, तर इतर दाईम्यो यांना सामुराईच्या श्रेणीतून बढती देण्यात आली, विशेषतः एडो काळात.
दाईम्यो अनेकदा त्यांच्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी सामुराईला कामावर ठेवत होते. या कामासाठी सामुराईंना ते जमीन किंवा अन्न मोबादला देत असत. त्याकाळी पैसे देणे तुलनेने महाग होते. स.न. १८७१ मध्ये प्रीफेक्चर प्रणालीचा अवलंब करून मेजी पुनर्संचयित झाल्यानंतर दाईम्यो युग संपुष्टात आले.
दाईम्यो
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?