एडो किल्ला

या विषयावर तज्ञ बना.

एडो किल्ला

इडो किल्ला (江戸城), तथा चियोदा किल्ला (城 田 城) हा जपानमधील एक भुईकोट किल्ला आहे. याची रचना १४५७ मध्ये एता दाकानने केली होती. हा किल्ला आता तोक्यो शाही महालाचा एक भाग आहे. सध्याच्या मुयोशी प्रांताच्या तोशिमा जिल्हा, चियोदा गावाजवळ अशलेल्या या किल्ल्याला आधी इदो म्हणून ओळखले जात असे. तोकुगावा इयेआसू यांनी येथे तोकुगावा शोगुनतीची स्थापना केली. हे शोगुनचे निवासस्थान आणि शोगुनतीचे मुख्यालय होते आणि जपानी इतिहासाच्या इदो काळात लष्करी राजधानी म्हणून देखील कार्यरत होती. शोगुनच्या राजीनाम्यानंतर आणि मेजीच्या पुनर्स्थापनेनंतर या किल्ल्याचे रूपांतर शाही निवासस्थानात केले गेले. किल्ल्याचे काही खंदके, भिंती आणि तटबंदी अजूनही तशाच आहेत. इदो कालावधीत हा किल्ला अधिक मोठा होता. सध्याचे तोक्यो स्थानक आणि तोक्यो शहराचा मारुनुची विभाग सर्वात बाह्य खंदक मध्ये बनविलेला आहे. तसेच यात कितानोमारू पार्क, निप्पॉन बुडोकान हॉल आणि आसपासच्या परिसरातील इतर खुणादेखील आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →