दत्तू बबन भोकनळ (५ एप्रिल, १९९१) हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी रोइंगपटू आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या तळेगांव या छोट्या गावात एका कामगार कुटुंबात दत्तू भोकनळचा जन्म झाला. वडिलांचे कर्करोगाने निधन झाल्याने कुटुंब पोसण्यासाठी दत्तू लष्करात भरती झाला. बीड जिल्ह्यात झालेल्या चाचण्यांत उत्तीर्ण होऊन तो लष्करात आला.
पुण्यातल्या खडकी येथील बॉंबे इंजिनिअरिंग ग्रुप या लष्कराच्या शाखेत काम करताना भोकनळने रोइंग मध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तेथील कुसरत अली हे त्याचे पहिले शिक्षक होते. या खेळातील पुढील शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यातीलच आर्मी रोइंग नोडमध्ये बदलीवर गेला. तेथे रोइंगचे राष्ट्रीय कोच इस्माईल बेग यांनी त्याला मार्गदर्शन केले. भोकनळने २०१४ मधील राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत भाग घेऊन दोन सुवर्ण पदके जिंकली. त्याच वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.
दत्तू भोकनळ
या विषयातील रहस्ये उलगडा.