अंजली भागवत (५ डिसेंबर, इ.स. १९६९ - ) ही एक व्यावसायिक भारतीय नेमबाज आहे. अंजलीला नेमबाजीच्या क्षेत्रामधे मानाचा समजला जाणारा ISSFचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा पुरस्कार २००२ साली म्युन्शेन येथे मिळाला. २००३ मध्ये मिलान येथे पैकी ३९९ गुण मिळवून तिने पहिला विश्वचषक जिंकला. तिने सलग तीन ओलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सन २००० मध्ये सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ती अंतिम फेरीपर्यंत पोचली होती. कॉमनवेल्थ खेळामध्ये तिने १२ सुवर्ण व ४ रौप्य पदके जिंकली आहेत. १० मीटर एर रायफल आणि स्पोर्ट्स रायफल ३ पी मध्ये तिचे कॉमनवेल्थ रेकॉर्ड आहे. २००३ मधील आफ्रो-आशियाई खेळांमध्ये, भागवतने अनुक्रमे क्रीडा ३ पी आणि एर रायफल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला नेमबाज बनून इतिहास निरमिला.
अंजली भागवत हिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १३ नवे विक्रम प्रस्थापित केले, आणि ५५ सुवर्ण, ३५ रौप्य व १६ कांस्य पदके जिंकली. भारतातील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिच्या नावावर ८ नवे विक्रम नोंदले गेले.
अंजली भागवत
या विषयावर तज्ञ बना.