दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. सर्व सामने लखनौमधील अटल बिहारी स्टेडियमवर खेळविण्यात आले. दक्षिण आफ्रिकन संघ भारतात २६ फेब्रुवारी रोजी दाखल झाला. त्यानंतर संपूर्ण संघ ६ दिवस विलगीकरणात होता.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिका महिलांनी ४-१ अशी जिंकली. १ला आणि २रा महिला ट्वेंटी२० सामना जिंकत दक्षिण आफ्रिका महिलांनी भारतावर ऐतिहासिक पहिला महिला ट्वेंटी२० मालिका विजय संपादन केला. ट्वेंटी२० मालिकेतील शेवटचा सामना भारतीय महिलांनी ९ गडी राखत जिंकला. परिणामी दक्षिण आफ्रिका महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२०-२१
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.